वांगी क्र. ३ येथील सायली कारंडे एटीएस प्रज्ञाशोध परीक्षेत राज्यात प्रथम

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – राज्यस्तरीय एटीएस प्रज्ञाशोध परीक्षेत वांगी नंबर 3 येथील कुमारी सायली दीपक कारंडे या विद्यार्थिनीने 200 पैकी 200 मार्क मिळवत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. सायली सध्या जिल्हा परिषद शाळा निंबाळकर वस्ती वांगी 3 येथे दुसऱ्या इयत्तेत शिकत असून तिला या परीक्षेसाठी शिक्षक महेश साळुंखे यांचे मार्गदर्शन मिळाले.

सायली ही ज्ञानदीप कोचिंग क्लासेसचे दीपक कारंडे व भाग्यश्री कारंडे यांची कन्या असून या दोघांनीही लहानपणापासूनच आपल्या सायली मध्ये अभ्यासाची गोडी निर्माण केली. ग्रामीण भागातील मुले ही राज्यात प्रथम क्रमांक मिळवू शकतात हे सायलीने दाखवून दिले आहे जिद्द, चिकाटी, मेहनत व योग्य मार्गदर्शन असेल तर यश मिळवणे अवघड नाही.

तिने मिळवलेल्या यशाबद्दल गटविकास अधिकारी मनोज राऊत, गटशिक्षणाधिकारी श्री राजकुमार पाटील ,विस्तार अधिकारी श्री.नलवडे ,केंद्रप्रमुख तोडमल सर ,मुख्याध्यापक ठाकर गुरुजी,शाळा व्यवस्थापन समिती तसेच ग्रामस्थांकडून सायलीचे व कारंडे कुटुंबीयांचे कौतुक होत आहे.
