किरकोळ कारणावरून चौघाकडून एकावर चाकूने हल्ला व जीवे मारण्याची धमकी.. - Saptahik Sandesh

किरकोळ कारणावरून चौघाकडून एकावर चाकूने हल्ला व जीवे मारण्याची धमकी..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : तुला माझा काय त्रास आहे, तु मला गावात का राहू देत नाही, असे म्हणून चौघांनी एकावर दगडाने व चाकुने हल्ला करुन जीवे मारण्याची धमकी दिली आहे. हा प्रकार केडगाव (ता.करमाळा) येथे ११ जुन रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडला आहे.

याप्रकरणी शंकर पावण्या काळे यांनी करमाळा पोलीसात फिर्याद दिली असून, त्यात त्याने म्हटले की, मी व माझी पत्नी केडगाव येथे रहिवास करतो, तसेच माझा भाचा चैन्या भामट्या भोसले हा त्याच्या बायकोसोबत केडगाव येथेच राहतो परंतू त्याच्या अनेक तक्रारी गावातून येत होत्या. त्यामुळे मी व माझ्या बायकोने त्याला तु भिगवणला जावून रहा असे सांगितले, त्याला त्याचा राग येत होता. त्यामुळे तो माझ्यावर राग धरून होता. ११ जुन रोजी शेतातील कामे करून मी घरी आलो व किराणा सामान आणण्यासाठी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमाराव गावात गेलो असता तेथे चैन्या भोसले व त्याचा मेव्हणा मौल्या निलकंट्या काळे हे दोघे होते. त्यांनी मला तुला माझा काय त्रास आहे, तु मला गावात का राहू देत नाही, असे म्हणून चाकुने हल्ला केला तसेच यावेळी आमच्या भावकीतील बाप्या राजा काळे व राजा किड्या काळे दोघे रा. केडगाव यांनीही मला मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली आहे. यात मी जखमी झालो. याप्रकरणी करमाळा पोलीसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!