डिजीटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या करमाळा तालुकाध्यक्षपदी दिनेश मडके तर उपाध्यक्षपदी शितलकुमार मोटे
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष राजा माने व सोलापुर जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली डिजीटल मिडिया संपादक पत्रकार संघटना शाखा करमाळा कार्यकारीणी करमाळा तालुका अध्यक्ष दिनेश उद्धवराव मडके यांनी जाहीर केली आहे.
या संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी दिनेश मडके तर तालुका उपाध्यक्षपदी शितलकुमार मोटे, गौरव मोरे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच सचिवपदी नरेंद्रसिंह ठाकुर, सहसचिवपदी राजाराम माने, खजिनदारपदी ॲड.सचिन हिरडे, संघटक ज्ञानदेव काकडे, संपर्कप्रमुखपदी अशोक मुरूमकर, सुर्यकांत होनप, व्यवस्थापक प्रसिद्धीप्रमुखपदी अंगद भांडवलकर यांची निवड केली आहे. तालुका कार्यकारणी सदस्य म्हणून राहुल रामदासी, सिद्धार्थ वाघमारे, हर्षवर्धन गाडे, सागर गायकवाड यांची तर ज्येष्ठ सल्लागार सदस्यपदी डॉ.ॲड.बाबुराव हिरडे, नासिर कबीर, महेश चिवटे, आशपाक सय्यद, अशोक नरसाळे, डि.जी.पाखरे यांची निवड करण्यात आली आहे.
डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यांनी शासनमान्यता दिली आहे. केंद्र राज्य शासनामार्फत त्याची प्रक्रिया सुरू आहे. डिजिटल मीडिया पत्रकार संपादक महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या संकल्पनेतुन भगिरथ प्रयत्नांमधून डिजिटल मिडिया पत्रकारितेला अधिमान्यता मिळाली असून, राजा माने आदेशानुसार जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली डिजिटल मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांना शासकीय सोयी सवलतींचा लाभ मिळवून देणे पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी सदैव कटीबध्द राहुन काम करणार आहे.
याबरोबरच प्रिंट मिडियाप्रमाणेच डिजीटल मिडियाला शासनाच्या जाहिराती व अधिस्विकृती मिळवुन देण्यासाठी प्रयत्नशिल राहणार आहे. पत्रकार सुरक्षा विमा योजना पत्रकार कुटुंब कल्याण योजना पेन्शन योजना पत्रकारांना शासन दरबारी नोंद होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांच्या कल्याणासाठी डिजिटल मीडिया पत्रकार संघ कार्यरत राहणार असल्याचे डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे करमाळ तालुकाध्यक्ष पत्रकार दिनेश मडके यांनी सांगितले.