संभाजी ब्रिगेडची जेऊर येथे बैठक संपन्न - विविध निवडी केल्या जाहीर - Saptahik Sandesh

संभाजी ब्रिगेडची जेऊर येथे बैठक संपन्न – विविध निवडी केल्या जाहीर

केम (प्रतिनिधी/ संजय जाधव) – संभाजी ब्रिगेडचा प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी प्रत्येक तालुक्यात आढावा बैठक व संघटन बांधणी कार्यक्रम केला जात असतो. त्याचाच भाग म्हणून या महिन्यात आज (दि.३) जेऊर येथे पंढरपूर विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात बाळासाहेब तोरमल यांची सोलापूर जिल्हा संघटक म्हणून निवड करण्यात आली. याचबरोबर सागर साखरे यांची करमाळा तालुका उपाध्यक्ष पदी, नवनाथ खबाले यांची करमाळा तालुका संघटक पदी तर अजित उपादे यांची जेऊर शहर उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

या बैठकीस बोलताना प्रदेश संघटक दीपक दादा वाडेकर म्हणाले संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना सामाजिक कार्य करत असताना काही अडचणी आल्यास व कोणताही अन्याय अत्याचार करत असल्यास महाराष्ट्रातील संभाजी ब्रिगेड यांच्या पाठीमागे खंबीर पणे उभी राहिल.यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रदीप मिसाळ व श्याम कदम यांनी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

या बैठकीला प्रदेश संघटक दीपक दादा वाडदेकर,पुणे विभागीय अध्यक्ष श्याम भैया कदम,विभागीय उपाध्यक्ष राजू मगर,जिल्हा अध्यक्ष प्रदीप मिसाळ पाटील करमाळा तालुका अध्यक्ष सुहास पोळ माढा तालुका अध्यक्ष सौरभ भोसले सांगोला तालुका अध्यक्ष राजू शिंदे सरपंच विकास बापू गुंड जेऊर शहराध्यक्ष अतुल निर्मळ निलेश पाटिल हेमंत शिंदे आदिनाथ माने पिंटु जाधव सचिन गारुडे गणेश नाईकनवरे अर्जुन नाईकनवरे अविनाष घाडगे नानासाहेब पोळ सचिन पोळ वैभव मोहिते अभिजीत म्हमाणे सागर लोंढे सागर बनकर विश्वनाथ सुरवसे रंजीत कांबळे बंडू मोहिते तसेच सांगोला, माढा, करमाळा, पंढरपूर येथील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. शेवटी बाळासाहेब तोरमल यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!