करमाळा बसस्थानकावर आढळला बेवारस मृतदेह..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा येथील बसस्थानकावर एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे, याप्रकरणी करमाळा पोलिसांना माहिती मिळताच करमाळा बस स्थानकावर जावून मयत व्यक्तीला उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे.
मयत व्यक्तीचे नाव अद्याप समजले नाही, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून हा व्यक्ती करमाळा बसस्थानकावर आढळून येत होता, असे येथील स्थानिक व्यक्तीकडून सांगण्यात येत आहे, काल रात्री पासून हा व्यक्ती बस स्थानकावर पडलेल्या अवस्थेत होता, आज सकाळी पोलिसांना माहिती मिळताच त्याला उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.