‘रासप’च्या जनस्वराज यात्रेनिमित्त माजी मंत्री महादेव जानकर यांचा करमाळा गाव भेट दौरा..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : रासपच्या जनस्वराज्य यात्रेनिमित्त माजी मंत्री महादेव जनकर यांनी करमाळा तालुक्यात गावभेट दौरा केला असून, आज (ता.१०) त्यांनी रासपच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली, करमाळा तालुक्यात वरकुटे येथे त्यांचे स्वागत केले, तसेच पुढे त्यांनी अळसुंदे, सालसे, फिसरे, पांडे येथे भेट देवून कार्यकर्त्यांची विचारपूस करून सर्व माहिती घेतली.
श्री देवीचामाळ येथे मंत्री जानकर यांनी धायखिंडी, खांबेवाडी येथील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर पुढे करमाळा शहरातील भवानीनाका, एसटी स्टॅन्ड, दत्तमंदिर, कोर्ट रोड व सिद्धार्थनगर येथे जानकर यांनी भेटी दिल्या आहेत. त्यानंतर देवळाली, जेऊर, शेलगाव फाटा, पांगरे व कंदर येथेही त्यांनी भेटी दिल्या आहेत.
यावेळी जिल्हा सरचिटणीस अंगद देवकाते, तालुकाध्यक्ष जीवन होगले, तालुका उपाध्यक्ष रावसाहेब बिनवडे, राहूल शिंदे, विठ्ठल भिसे, अल्पसंख्यांक आघाडीचे तालुकाध्यक्ष जहांगीर पठाण, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा शारदा सुतार, गणेश जगताप,लक्ष्मन शिंदे, वरकुटे चे सरपंच दादासाहेब भांडवलकर,
करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजीराव बंडगर सर,ढोकरीचे सरपंच देवा पाटील,आ.माजी संचालक धुळाभाऊ कोकरे, भास्कर भांगे,आप्पा चौघूले, प्रवीण होगले, गणेश काकडे, विकास मेरगळ, रघुवीर खटके, जगनाथ सलगर, रेल्वे प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष सुहास सुर्यवंशी, प्रवीण करे, शंकर सूळ, सुहास ओहळ, बाळासाहबे टाकले, संतोष पाटील, नारायण शिंदे, बापू कोकरे, अमोल सुकळे, तानसिंग खांडेकर, शिवाजी देवकते, आदी उपस्थित होते.