मंदिराच्या बांधकामाच्या हिशोबावरून चौघांकडून एकास मारहाण..
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : मंदिराच्या बांधकामाचा हिशोब का देत नाही, या कारणावरून चौघा जणांनी कमिटीतील एकास गजाने मारहाण करून जखमी केले आहे. हा प्रकार कुंभारगाव येथे १२ जुलैला सकाळी साडेनऊच्या सुमारास घडला आहे.
या प्रकरणी मच्छिंद्र शंकर पानसरे रा. कुंभारगाव यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की कुंभारगाव येथे महादेवाच्या मंदिराचे काम चालू आहे. त्यासाठी कमिटी नेमली असून त्या कमिटीत मी सदस्य आहे. या मंदिराचे बांधकाम चालू असताना १२ जुलैला सकाळी साडेनऊ वाजता मी घरी असताना बाळू गलांडे, भारत गलांडे, विलास गलांडे, लक्ष्मण गलांडे हे आले व मंदिराच्या बांधकामाचा हिशोब का देत नाही.
असे म्हणून त्यांनी मला खोऱ्याच्या लाकडी दांडक्याने, दगडाने, गजाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले आहे. या प्रकरणी पोलीसांनी चौघाविरूध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.