भारताच्या ‘चंद्रयान’ मोहिमेला इरा पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यानी दिल्या शुभेच्छा.!!

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : आज चंद्राकडे इस्रोचे चंद्रयान झेपावले, भारत हा चंद्रावर जाणारा चौथा देश आहे, तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत पहिला देश ठरणार आहे. याचा प्रत्येक भारतीयाला सार्थ आनंद आहे.
या आनंदात सहभागी होत, चिखलठाण नं १ (ता.करमाळा) येथील इरा पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यानी चांद्रयान ३ ची प्रतिकृती बनवून इस्रोच्या शास्त्रज्ञांना शुभेच्छा दिल्या. या सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे स्कूलचे संस्थापक अध्यक्ष डॉ.ब्रिजेश बारकुंड यांनी कौतुक करून अभिनंदन केले.


