सकल जैन समाजाच्या ‘करमाळा बंद’ ला सावंत गटाचा पाठींबा..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : कर्नाटक मध्ये झालेल्या जैन साधूंची हत्या झाली, यासाठी करमाळा शहरातील सकल जैन समाजाच्यावतीने मुक मोर्चा व ‘करमाळा बंद’ चे आवाहन करण्यात आले आहे, या ‘बंद’ ला करमाळा शहरातील सावंत गटाच्यावतीने माजी नगरसेवक संजय सावंत यांनी पाठींबा दिला असुन, या घटनेचा जाहिर निषेध व्यक्त केला व कर्नाटक सरकार ने त्वरित आरोपी वर कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे.
यावेळी सकल जैन समाजाच्या पदाधिकारी संतोष दोशी, सुयश दोशी यांना पाठींब्याच पत्र दिले, यावेळी फारुक जमादार, राजेंद्र जगताप सुनील फुलारी आदी मान्यवर उपस्थित होते.



