जबरदस्तीने अतिक्रमण करणाऱ्याविरूध्द गुन्हा दाखल.. - Saptahik Sandesh

जबरदस्तीने अतिक्रमण करणाऱ्याविरूध्द गुन्हा दाखल..

करमाळा / संदेश प्रतिनिधी

करमाळा : रस्त्याच्या कारणासाठी जबरदस्तीने जमीनीत अतिक्रमण करून दमदाटी करणाऱ्या विरूध्द करमाळा पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार जेऊर (ता. करमाळा) येथे ९ ऑगस्टला सकाळी अकरा वाजता झाला आहे.

या प्रकरणी नामदेव तुकाराम गुंजाळ (रा. जेऊर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की जेऊर येथील जमीन गट नं.७७ अ मध्ये पेरणीचे काम चालू असताना जेऊर येथील किसन माने व त्यांची पत्नी (नाव माहित नाही) व एक अनोळखी गडी तिघांनी मिळून ९ ऑगस्टला सकाळी अकरा वाजता आमच्या मालकीच्या जमिनीत दक्षिण-उत्तर चालीचा १० फुट बाय २५० फुट रस्त्यासाठी धाक दपटशाही दाखवून अतिक्रमण करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस शिपाई चेतन पाटील हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!