भगवान रणसिंग यांचे निधन - Saptahik Sandesh

भगवान रणसिंग यांचे निधन

करमाळा / संदेश प्रतिनिधी

करमाळा : खातगाव नं. २ येथील भगवान विठोबा रणसिंग (वय – ८३) यांचे काल (ता. २३) राहत्या घरी निधन झाले आहे. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

भगवान रणसिंग यांना सर्वजण आप्पा म्हणून ओळखत होते. अजातशत्रु म्हणून त्यांची ओळख होती. तसेच उत्तम मृदुंगाचार्य म्हणून त्यांची ओळख होती. कार्तिक एकादशी दिवशी तसेच नातवाच्या सोळाव्याचा कार्यक्रम संपल्यानंतर त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने रणसिंग परिवारावर शोककळा पसरली आहे. आण्णासाहेब रणसिंग यांचे ते वडील तर जिल्हा बँकेचे वरीष्ठ अधिकारी राजेंद्र रणसिंग यांचे चुलते होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!