गाईला दुग्धाभिषेक करत केममध्ये शिवसेनेने केले दूध दरासाठी आंदोलन

0

केम (संजय जाधव) – दुधाला चांगला दर मिळावा यासाठी केम येथील संभाजी चौकात आज (दि.४ डिसेंबर) शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. गायीच्या दुधाला ४० रू. व म्हशींच्या दुधाला ७० रू. द्या अन्यथा शिवसेनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे (ठाकरे गट) उपतालुकाप्रमुख श्री हरि भैय्या तळेकर यांनी दिला. यावेळी आंदोलन कर्त्यांनी गाईला दुग्धाभिषेक केला.

यावेळी शेतकऱ्यांचा वतीने कृष्णाई दूध डेअरीचे चेअरमन कालीदास तळेकर म्हणाले की, सध्याची दुष्काळजन्य परिस्थिती पाहता शेतकऱ्यांना शेती आणि जोड धंदा म्हणून दूध व्यवसाय करणे जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. दुष्काळजन्य परिस्थिती आणि दूध उत्पादनावर होणारा खर्च प्रति लिटर दुधाला मिळणारा दर याचे गणित जुळविताना शेतकऱ्यांचा दुध व्यवसाय अडचणीत आला आहे. गाईच्या दुधाला ४० रू व म्हशींच्या दुधाला ७० रू भाव मिळाला तरच शेतकरी आर्थिक अडचणी मधून बाहेर येईल.

या वेळी किरण तळेकर म्हणाले कि, वैरण व पशुखाद्याचे भाव वाढले पण शासनाने मात्र दूधाचे दर वाढविले नाही. शेतकऱ्यांचा प्रपंच दुध व्यवसायावर चालतो पण आता शेतकरी मात्र आर्थिक अडचणीत आला आहे. पशुधन कसे जगवायचे हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी दूधाला भाव मिळालाच पाहिजे.

या वेळी रमेश तळेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या वेळी कुंडलिक देवकर, हनुमंत देवकर, ज्ञानेश्वर देवकर, सुरेश देवकर, गणेश देवकर, दिनकर सुरवसे, विष्णू यादव, राजेंद्र देवकर, दादा सातव, मधुकर यादव संभाजी गुरव, दादा पळसकर, विठ्ठल पळसकर, महादेव पळसकर, हनुमंत पळसकर चेतन साखरे, सुभाष पळसकर जोतिराम पळसकर, सचिन बिचितकर, रेवणनाथ बिचितकर, बाळासाहेब अवघडे, राजेंद्र कांबळे, भाऊसाहेब गुटाळ, समाधान चव्हाण, नागेश देवकर, अजितदादा तळेकर, नागनाथ तळेकर, समीर दादा तळेकर,सतीष खानट, मच्छिंद्र राउत, उत्तरेश्वर गोडगे,आवीनाश तळेकर मनोज तळेकर भैरू म्हत्रे, हरिभाऊ तळेकर, अक्षय भोसले हरिदास तळेकर, अक्षय तळेकर, उत्तरेश्वर तळेकर, मामा देवकर, नवनाथ देवकर, शिवाजी मोरे,लवळे, अंनता तळेकर नितीन तळेकर, चव्हाण , शिवाजी तळेकर बाळासाहेब अवघडे आदि उपस्थित होते या शिवाय मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते या वेळी केम पोलिस चौकिचे श्री. जाधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!