बौद्धाचार्य सावताहरी कांबळे यांचे निधन

करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.२१: येथील रहिवासी असलेले बौद्धाचार्य सावताहरी कांबळे (वय ५४) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.त्यांच्या  मागे पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.  त्यांच्या निधनाने सामाजिक व धार्मिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
सावताहरी कांबळे हे मनमिळाऊ स्वभावाचे व्यक्तिमत्त्व म्हणून करमाळा तालुक्यात परिचित होते. भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून त्यांनी धम्मकार्य केले. समाजात बंधुभाव, समता आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या त्यांच्या कार्यामुळे त्यांनी अनेकांशी आपुलकीचे संबंध निर्माण केले होते. आज (दि. २१) दुपारी एक वाजता त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी समता सैनिक दलाच्या वतीने त्यांना मानवंदना देण्यात आली.
त्यांच्या निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!