कै.सौ.लता गाभणे-लखदिवे यांच्या स्मरणार्थ श्री कमलाभवानी मंदिरास १ लाख १ हजार रुपये देणगी…

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : श्रीजगदंबा कमलादेवी मंदिर ट्रस्ट च्या संयोजकाने
श्रीकमला देवी मंदिर जतन व संवर्धन कामास गेल्या सात महिन्यांपासून कामास सुरुवात केली असून, मंदिर जतन संवर्धनाचे काम प्रगतीपथावर आहे, ट्रस्ट चे अध्यक्ष सोमनाथ चिवटे सचिव अनिल पाटील व सर्व विश्वस्त यांनी मदतीचे आवाहन भक्तांकडे केले होते. या आव्हानास प्रतिसाद म्हणून कै.सौ.लता कल्याण गाभणे-लखदिवे यांच्या स्मरणार्थ गाभणे यांची कनिष्ठ कन्या अंजुषा कल्याण गाभणे रा.पुणे यांनी मंदिर समितीस १ लाख १ हजार रुपये
गुरुपौर्णिमेनिमित्त देण्यात आली आहे. यानिमित्त त्यांचा सत्कार श्री जगदंबा कमलादेवी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सोमनाथ चिवटे, व्यवस्थापक अशोक गाठे, यांनी सत्कार केला, या निमित्ताने श्रीकमलाभवानी मंदीर जीर्णध्दाराच्या कामासाठी भाविकांनी मदत करण्याचे आवाहन देखील ट्रस्टच्यावतीने करण्यात आले आहे.


