वांगी 2 येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : देशात 78 वा स्वातंत्र्य दिन देशभरात उत्साहात साजरा होत असताना वांगी नंबर 2 जिल्हा परिषद शाळेमध्ये स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले त्यामध्ये कवायत प्रभात फेरी भारत माता की जय घोषणा देत ध्वजारोहण मेजर सुभाष जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष बापूराव अण्णा देशमुख कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती ग्रामपंचायत सरपंच सुरेश जाधव उपसरपंच बशीर चाचा पटेल गणेश जाधव दिलीप ढाणे दत्तात्रय रणसिंग रोहिदास सातव अशोक तकिक नामदेव सपकाळ दत्ता ढावरे शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष विनोद डहाणे योगेश कोरे शाळेचे सर्व शिक्षक पत्रकार राहुल जाधव यांच्यासह सर्वाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी एटीएस स्पर्धा परीक्षा प्राविण्य विद्यार्थी सत्कार ट्रॉफी मेडल आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये शौर्यतेज मुळे, समीक्षा सपकाळ, प्रणिती सातव, समर्थ व्यवहारे, वैष्णवी सातव वरद दादा बोराडे आलिशा अकबर शेख कार्तिक सचिन पाबळे त्याचबरोबर ऑलम्पिक स्पर्धा वरद दादा बोराडे सिल्वर पदक सिद्धी सुहास गुळवे ब्रांच पथक आदित्य अशोक खराटे 25 किलो वजन गटात तालुकास्तर गोल्ड मेडल जिल्ह्यात निवड या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.




