पुणे पदवीधर निवडणुकीसाठी करमाळ्यात महाविकास आघाडीची बैठक - Saptahik Sandesh

पुणे पदवीधर निवडणुकीसाठी करमाळ्यात महाविकास आघाडीची बैठक

करमाळा(प्रतिनिधी)महाविकास आघाडीच्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार सौ.हर्षदा ताई देशमुख-जाधव यांच्या प्रचारार्थ आज खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करमाळा येथे बैठक घेतली.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख, जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य सवितादेवी राजेभोसले, ज्येष्ठ नेते शहाजीराव देशमुख, भारतरीनाथ अभंग, तालुका अध्यक्ष अमरजित साळुंके, सरचिटणीस संतोष वारे , आदिनाथ कारखान्याचे उपाध्यक्ष महेंद्र पाटील, आदिनाथ कारखान्याचे संचालक संतोष खाटमोडे पाटील, डॉ.अमोल घाडगे, देवानंद बागल, दत्तात्रय देशमुख, प्रा.सुरेंद्र निळ आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

यावेळी खासदार मोहिते पाटील यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आला. तसेच पुणे पदवीधर मतदारसंघातील सर्व पदवीधर मतदारांनी सौ. हर्षदा ताई देशमुख-जाधव यांना आपला पाठिंबा देऊन मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केले.
जिल्हाध्यक्ष वसंत नाना देशमुख, रवींद्र पाटील, प्रा सुरेंद्र निळ यांनी देखील मार्गदर्शन केले.

प्रसंगी तालुका उपाध्यक्ष नीलेश झोळ, ॲड. प्रशांत बागल, राष्ट्रवादी युवक चे तालुका अध्यक्ष महेशराजे भोसले, आबासाहेब टापरे, शिवाजी जाधव, अमोल जाधव आदींसह पदवीधर मतदार, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अमरजीत साळुंके यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तर ॲड.प्रशांत बागल यांनी उपस्थित सर्व प्रमुख मान्यवर, कार्यकर्ते व मतदार यांचे आभार व्यक्त केले.

error: Content is protected !!