सुरक्षेच्या दृष्टीने करमाळा शहरात सी.सी.टिव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : सुरक्षेच्यादृष्टीने करमाळा शहरातील बाजार पेठेत सी.सी.टिव्ही कॅमेरे बसविण्याची गरज असून या साठी सर्वांनी मागणी लावून धरणे गरजेचे आहे, आपण देखील यासंदर्भात आमदार संजयमामा शिंदे यांची भेट घेणार असल्याची माहिती धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठाणचे अध्यक्ष तसेच मनसेचे तालुकाध्यक्ष संजय घोलप दिली.
याबाबत बोलताना त्यांनी म्हटले कि, करमाळा शहरातील गाड्या चोरी, दरोडे, महिला, शालेय विद्यार्थिनीची छेडछाड या सर्वच बाबतीत सुरक्षित ठेवण्यासाठी तसेच शहरात काही घटना झालीच तर पोलिस तपास योग्य व लवकर होऊन गुन्हेगारांवर आळा बसावा यासाठी करमाळा शहरातील सर्व भागात सी.सी.टिव्ही कॅमेरे बसविण्यात यावे यासाठी आपण आमदार संजयमामा शिंदे यांची भेट घेवून त्यांच्या मार्फत शहरातील सर्व भागात सी.सी.टिव्ही कॅमेरे बसविण्यात यावे असे आवाहन करणार आहोत असेही श्री.घोलप यांनी सांगितले.
करमाळा शहरात आधुनिक सी.सी.टिव्ही कॅमेरे लावण्यासाठी निधी मिळवून संदर्भात आमदार संजयमामा शिंदे यांनी सहकार्य करावे यासाठी धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठाण व व्यापारी मित्रांसह भेट घेऊन पत्र देऊन मागणी करणार आहोत तरी करमाळा शहरातील सामाजिक , व्यापारी वर्गातील सर्व संघटना ,विविध घटकांनी आपल्या पत्राद्वारे आमदार संजयमामा शिंदे यांना मागणी करावी म्हणजे आपल्या शहरासाठी लवकर मागणी मान्य होईल अशी मागणी संजय घोलप यांनी केली आहे.