करमाळा पोलीस प्रशासना विरोधात शिवसेना ठाकरे गटाने केले आंदोलन - Saptahik Sandesh

करमाळा पोलीस प्रशासना विरोधात शिवसेना ठाकरे गटाने केले आंदोलन

केम (संजय जाधव) – करमाळा पोलीस प्रशासनाकडून सर्वसामान्य जनतेची अडवणूक होत असल्या बाबत शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख शाहूदादा फरतडे यांच्या नेतृत्वाखाली काल (दि.२७) शुक्रवारी  भर पावसात सकाळपासून धरणे आंदोलन करण्यात आले ,पोलीस प्रशासना विरोधात भर पावसात घोषणाबाजी करण्यात आली.

करमाळा पोलीस स्टेशन मध्ये सर्व सामन्या नागरींकाची अडवणूक केली जाते ठाणे अंमलदार बिट हवालदार अरेरावी करतात, करमाळा बसस्थानकावरून महिलांचे लाखो रुपयांचे दागिने व शुक्रवार बाजारातुन शेकडो लोकांचे मोबाईल चोरीला गेले आहेत, यातील एकही आरोपी
का सापडत नाहीत, ऊसवाहतुकदार यांच्या फसवणूक संदर्भात विशेष पथक नेमले जावे, अल्पवयीन मुली बेपत्ता आहेत त्यांच्या पालकांना अपमानास्पद वागणूक दिली जाते मात्र बेपत्ता मुलींचा तपास लागत इत्यादी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले होते.

आंदोलन सुरू झाल्यानंतर पावसाला सुरवात झाली मात्र आंदोलन आपल्या भुमिकेवर ठाम राहिले. पोलीस प्रशासना विरोधात घोषणाबाजी सुरू केल्यानंतर पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी तात्काळ आंदोलन स्थळी येवून आंदोलकांशी चर्चा केली. ठाणे अंमलदार बिट हवालदार यांना कडक सुचना करून सर्व सामान्य नागरिकांशी सौजन्य पुर्ण व्यवहार करण्याच्या सुचना दिल्या जातील, बसस्थानकावर कायम स्वरूपी पोलीस नेमले जातील, भुरट्या चोरांचा बंदोबस्त करू अल्पवयीन मुलींच्या पालकांना आम्ही धीर देत आहेत आमची दोन पथकं सातारा व गुजरात येथे गेली आहेत लवकरच सर्व गुन्ह्यांचा तपास केला जाईल असे आश्वासन पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिल्यानंतर सदरचे आंदोलन मागे घेण्यात आले.

यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख विजय माने ,युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे, समन्वयक प्रसाद निंबाळकर, विभाग प्रमुख बालाजी वाडेकर, बिभिषण अडसूळ, शिवाजी नाईकनवरे, सोमनाथ पोळ, गटप्रमुख मयुर तावरे, शाखाप्रमुख ओंकार कोठारे, योगेश नगरे,शाखाप्रमुख आकाश सरडे, भाऊ मस्तुद, शाखा प्रमुख दिंगबर काटुळे, डाॅ गणेश हाके, आदी उपस्थित होते. या आंदोलनास प्रा रामदास झोळ सर,शेतकरी संघटनेचे गणेश मंगवडे, माजी नगरसेवक फारूक जमादार आदींनी पाठींबा दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!