मद्यप्राशन करून ट्रक चालविणाऱ्या विरूध्द गुन्हा दाखल..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : मद्यप्राशन करून ट्रक चालविणाऱ्या विरूध्द करमाळा पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २७ सप्टेंबरला सकाळी पावणेबारा वाजता जामखेड चौकात घडला आहे. यावेळी ट्रक क्र. के.ए. ५६-२६०७ चा चालक दशरथ शंकर हसे रा.मुचलंब, ता. बसव कल्याण (कर्नाटक) हा मद्यप्राशन करून गाडी चालविताना आढळून आला.

त्यावेळी त्याची ब्रेथ ॲनालायझर मशीनद्वारे तपासणी केली असता तो मद्य पेल्याचे आढळून आला. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून त्यास न्यायालयात हजर केले. आरोपीने न्यायालयात गुन्हा कबुल केल्यानंतर त्याला दहा हजार रूपयाचा दंड केला आहे. याचप्रमाणे नूरअली मैन्नुदिन शा हाही दारू पिवून ट्रक चालवताना आढळून आला. त्याच्याविरूध्द ही गुन्हा दाखल केला होता. त्यास न्यायालयात हजर केले असता त्यालाही न्यायालयाने १० हजार रूपयाचा दंड केला आहे.





