शेलगाव येथे आर ओ प्लांट चे भूमिपूजन कार्यक्रम संपन्न

करमाळा (दि.४) – करमाळा तालुक्यातील शेलगाव (क) येथील माता रमाई नगर येथे R O प्लांट चे भूमिपूजन शुभहस्ते शिवसेना जिल्हा प्रमुख व सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य महेश चिवटे जिल्हाप्रमुख शिवसेना सदस्य सोलापूर यांच्या हस्ते करण्यात आले. चिवटे यांच्या प्रयत्नातून हा आर ओ प्लांट बसवण्यात येत असून यासाठी पाच लाखचा निधी जिल्हा नियोजन समिती मधून त्यांनी मंजूर करून घेतला आहे.

या भूमिपूजन कार्यक्रमास शिवसेना विभाग प्रमुख बाबुराव माने, सरपंच प्रतिनिधी आत्माराम वीर माजी सरपंच अशोक काटोळे माजी सरपंच दादा वीर ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी राहुल कुकडे, ग्रामपंचायत सदस्य धर्मराज शिंदे माजी ग्रामपंचायत सदस्य विलास कातुरे माजी ग्रामपंचायत सदस्य अशोक माने, अंकुशराव जाधव (शिवसेना ओबीसी तालुका अध्यक्ष ), अण्णा शिंदे गणेश पायघन बाळनाथ वीर मुकेश सांगडे विलास वीर शरद शिंदे लक्ष्मण शिंदे धनराज बनसोडे दीपक बनसोडे भीमराव बनसोडे एकनाथ शिंदे रघुनाथ शिंदे महादेव काटूळे अनिकेत शिंदे युवराज शिंदे दत्ता शिंदे प्रदीप बनसोडे आदी जण उपस्थित होते.





