खास दिवाळीसाठी मुंबई-लातूर साप्ताहिक विशेष ट्रेन सुरू होणार – करमाळा तालुक्यातील ‘या’ स्टेशनवर थांबणार

केम (संजय जाधव) – खास दीपावली सणानिमित्त मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते लातूर अशी साप्ताहिक विशेष ट्रेन (train No. 01105) सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. करमाळा तालुक्यातील जेऊर व केम या स्टेशनवर या गाडीला थांबा असल्याने करमाळा तालुका व परिसरातील लोकांना या गाडीचा फायदा होणार आहे.
ही साप्ताहिक विशेष गाडी १९ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबरपर्यंत धावणार आहे. दर शनिवारी रात्री १२ वाजून ३० मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटणार असून लातूर येथे त्याच दिवशी सकाळी ११ वाजून ४० मिनिटांनी पोहोचणार आहे. नंतर ती ट्रेन ४:३० वाजता लातूरहून निघून दुसऱ्या दिवशी ४:१० ला मुंबई CSMT ला पोहचेल . या ट्रेनच्या जाण्याच्या आणि येण्याच्या प्रवासात ती दादर, ठाणे , कल्याण, लोणावळा , पुणे , उरुळी, दौंड , भिगवण,जेऊर, केम, कुर्डुवाडी, बार्शी , उस्मानाबाद, हरंगुळ या ठिकाणी थांबणार आहे.
ही ट्रेन मुंबई हुन शनिवारी रात्री १२:३० ला निघाल्यानंतर पुणे स्टेशनला पहाटे ४ ला पोहोचेल, जेऊर स्टेशनला सकाळी ६:२८ ला पोहोचेल, केम स्टेशनला ६:४५ ला पोहोचेल. कुर्डुवाडी ला ७ वाजता पोहोचेल.





