श्री उत्तरेश्वर मंदिरात शिवलिंगास भवानी मातेच्या प्रतिकृतीची सजावट
केम (संजय जाधव) – केम येथील ग्रामदैवत श्री उत्तरेश्वर मंदिरामध्ये सोमवार निमित्त शिवलिंगाची वेगवेगळया रूपात सजावट केली जाते त्या प्रमाणे नवरात्र असल्याने सुंदर अशी तुळजा भवानी मातेची प्रतिकृती तयार करण्यात आली.
ही सजावट मंदिराचे पुजारी समाधान गुरव व त्यांचे सहकारी केदार यांनी केली. श्री च्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. ही सजावट भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. संपूर्ण मंदिर भाविकांनी फुलून गेले होते. या मंदिरामध्ये दर सोमवारी वेगवेगळया रूपात पुजा केली जाते. श्री उत्तरेश्वर देवस्थानचे महंत जयंतगिरी महाराज यांनी या सजावटीचे विशेष कौतुक केले.