धनगर समाजाच्या राज्यस्तरीय वधू-वर मेळाव्याचे आयोजन

करमाळा (दि.११) – धनगर समाज सेवा संघ पुणे आयोजित सर्व शाखीय १७ वा राज्यस्तरीय धनगर समाजाचा वधू-वर मेळावा रविवार दिनांक ५ जानेवारी २०२५ रोजी पिंपळे-गुरव (पुणे) येथे आयोजित केला असून १ डिसेंबर २०२४ पर्यंत नोंदणी करावी असे आवाहन घारगाव (ता.करमाळा) येथील संजय सरवदे यांनी केले आहे. ते धनगर समाज सेवा संघ पुणे शहर कार्यकारणी सदस्य आहेत.
अधिक माहिती देताना ते म्हणाले की, धनगर समाजातील सर्व पोटशाखे मधील धनगर समाज बांधवांनी आपल्या इच्छुक वधू-वरांची नावे १ डिसेंबर २०२४ पर्यंत ९६७३८३६८९८ या व्हाट्सअप नंबर वर नोंदणी करावी नावे नोंदणी सुरू करण्यात आली आहे आपल्या शिक्षित, उच्चशिक्षित मुला मुलींना अनुरूप वधू वर निवडीसाठी आपल्या वधू-वरांची नोंदणी करावी. ५ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत रामकृष्ण मंगल कार्यालय, शिवदत्त नगर (नवी सांगवी) पिंपळे गुरव पुणे ४११०६१ या ठिकाणी संपन्न होणार आहे.





