अंजनडोहचे माजी उपसरपंच शहाजी माने यांचे निधन
करमाळा (दि.१५) – अंजनडोह येथील माजी उपसरपंच शहाजी (भाऊ) माने ( वय – ५५) याचे आज (ता. १५) सायंकाळी सहाच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. माने हे अंजनडोह येथे क्रियाशील कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. उपसरपंच पदाबरोबरच धार्मिक व सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग होता. रिटेवाडी उपसासिंचन योजनेच्या जनजागरण अभियानात त्यांचा सिंहाचा वाटा होता. आज सायंकाळी अचानक त्यांच्या छातीत दुखायला लागले. त्यानंतर उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. त्यांचे मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी, भाऊ असा परिवार आहे. उद्या (ता. १६) सकाळी दहा वाजता अंजनडोह येथे त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.