युवराज किरवे यांचे आकस्मात निधन -

युवराज किरवे यांचे आकस्मात निधन

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : येथील राशिनपेठेतील रहिवाशी, भाजपाचे क्रियाशील कार्यकर्तेव स्टेट बँक ग्राहक सेवा केंद्राचे संचालक युवराज उर्फ धनंजय सुरेश किरवे (वय – ३८) यांचे आज सायंकाळी साडेचार वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने ग्राहक सेवा केंद्रात निधन झाले.

किरवे हे नेहमीप्रमाणे आपल्या ग्राहक सेवा केंद्रात कार्यरत असताना व ग्राहकांबरोबर चर्चा करत असताना अचानक चक्कर आली व त्यातच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने दवाखान्यात जाईपर्यंत त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या मागे पत्नी, एक लहान मुलगा तसेच एक बहिण व आई असा परिवार आहे. किरवे हे अतिशय उत्साही व धडाडीचे कार्यकर्तेम्हणून प्रसिध्द होते. त्यांच्या आकस्मात निधनाने संपूर्ण राशिनपेठ व शहरातील भाजपावर शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!