सर्वोदय प्रतिष्ठानची व्याख्यानमाला १९ सप्टेंबर पासून- जगताप, झिंजाड सह साळेगावकर यांची व्याख्याने होणार

करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.१६: येथील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाचे औचित्य साधून बौद्धिक व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. . ही तीन दिवसीय व्याख्यानमाला दि. १९ ते २१ सप्टेंबर २०२६ दरम्यान येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या विजयश्री सभागृहात दररोज सायंकाळी ६ वाजता होणार आहे.

या व्याख्यानमालेत
शनिवार, दि. १९ सप्टेंबर रोजी मुंबई येथील प्रसिद्ध कवी, लेखक व चित्रपट कथालेखक तसेच ‘चला हवा येऊ द्या’ फेम साहित्यिक अरविंद जगताप यांचे ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. रविवार, दि. २० सप्टेंबर रोजी पुणे येथील प्रसिद्ध लेखक देवा झिंजाड ‘एक भाकर तीन चुली’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत. तर सोमवार, दि. २१ सप्टेंबर रोजी माजलगाव येथील प्रसिद्ध साहित्यिक व कवी प्रभाकर साळेगावकर यांचे ‘क्रिएटिव्हिटी टू पॉझिटिव्हिटी’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.

विद्यार्थी, पालक तसेच करमाळा शहर व तालुक्यातील साहित्यप्रेमी आणि रसिकांनी या बौद्धिक व्याख्यानमालेचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन सर्वोदय प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक चव्हाण व सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

error: Content is protected !!