मुख्यमंत्री समृद्ध ग्राम विकास अभियानात उंदरगावची बाजी; ३० लाखांचे बक्षीस मंजूर!

करमाळा /संदेश प्रतिनीधी

करमाळा, ता.6 : मुख्यमंत्री समृद्ध ग्राम विकास अभियानांतर्गत करमाळा तालुक्यातील उंदरगाव ग्रामपंचायतीने जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला असून, ग्रामपंचायतीला ३० लाख रुपयांचे बक्षीस मंजूर झाले आहे.

ग्रामपंचायतींना विकासकामांसाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने शासनाने हे अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकासाठी ५० लाख, द्वितीय क्रमांकासाठी ३० लाख, तर तृतीय क्रमांकासाठी २० लाख रुपयांचे बक्षीस दिले जाते.

उंदरगाव ग्रामपंचायतीने विविध विकासात्मक उपक्रम राबवून गावाच्या विकासाचा आदर्श निर्माण केला आहे. या कामगिरीची दखल घेत ग्रामपंचायतीला द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज राऊत यांनीही उंदरगावच्या कामाकडे विशेष लक्ष दिले होते.
या यशामुळे उंदरगाव ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण असून, करमाळा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

error: Content is protected !!