दीपावली पाडव्यानिमित्त श्री उत्तरेश्वर मंदिरातील शिवलिंगाची पानांच्या मकराने सजावट - Saptahik Sandesh

दीपावली पाडव्यानिमित्त श्री उत्तरेश्वर मंदिरातील शिवलिंगाची पानांच्या मकराने सजावट

केम (संजय जाधव): केम येथील ग्रामदैवत श्री उत्तरेश्वर देवस्थानातील शिवलिंगाची दीपावली पाडव्याच्या निमित्ताने पानांच्या आकर्षक मकराने सजावट करण्यात आली. पुजारी समाधान गुरव, शिवराज लांडगे, शंकर देवकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही सजावट केली.

श्री उत्तरेश्वर मंदिरात दर सोमवारी तसेच विविध सण-उत्सवांच्या निमित्ताने शिवलिंगाची वेगवेगळ्या स्वरूपात आकर्षक सजावट व पूजा केली जाते. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ही सजावट पाहून विशेष आनंद मिळतो. पानांच्या मकराने केलेल्या सजावटीचे भाविकांकडून कौतुक करण्यात आले.

या मंदिरात प्रत्येक सोमवारी आणि विविध सणांच्या निमित्ताने शिवलिंगाची आकर्षक सजावट केली जाते. अशा सजावटीमुळे भाविकांचे मन प्रसन्न होते, अशी भावना श्री उत्तरेश्वर भक्त ज्ञानेश्वर तळेकर यांनी व्यक्त केली.

error: Content is protected !!