महिलांनी शेतीपुरक व्यवसायाचे बारकावे समजावून घेतल्यास कुटुंबाच्या प्रगतीला हातभार लागु शकतो – कृषीभूषण नामदेव साबळे

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : शेतीपूरक व्यवसायात महीलांचा सहभाग वाढल्यास शेतकरी कुटुंबाची प्रगती शक्य असल्याचे प्रतिपादन कृषीभूषण नामदेव साबळे यांनी शेटफळ ता करमाळा येथे तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासन कृषि विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) करमाळा यांचेवतीने शेटफळ (ता.करमाळा) येथील जिजाऊ महिला शेतकरी गट व लोकविकास फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या पुढाकाराने महिला शेतकरी सदस्यांसाठी आयोजित किसानगोष्टी कार्यक्रमात बोलताना केले.

याप्रसंगी पुढे बोलताना श्री.साबळे म्हणाले की, कृषिपूरक व्यवसायामध्ये शेळीपालन हा किफायतशीर व्यावसाय आहे. महिलांनी यामधील बारकावे समजावून घेऊन हा व्यावसाय केल्यास तो यशस्वी होऊन कुटुंबाच्या प्रगतीला हातभार लावू शकतो. यावेळी त्यांनी स्वतः करत असलेले बंदिस्त शेळीपालन व जंगली कुक्कुटपालन याविषयी मार्गदर्शन केले तसेच सेंद्रिय शेतीचे महत्व स्पष्ट केले.

यावेळी प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रकीया उद्योग या योजनेबद्दल जिल्हा संसाधन व्यक्ती मनोज बोबडे यांनी शेतकरी, शेतकरी गट , व महीलांनी एकत्र येत शेतमालावर प्रक्रिया करणारा उद्योग उभारू शकतात यासाठी शासनाकडून पस्तीस टक्के सबसिडी मिळू शकते याची सविस्तर माहिती महिलांना दिली. कृषी साह्यक सुप्रिया शेलार यांनी पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व याविषयावर महिलांना मार्गदर्शन केले.
यावेळी महिलांचा हळदीकुंकू समारंभ संपन्न झाला उपस्थित महिलांना फुले व फळांची रोपे भेट देऊन स्वागत जिजाऊ महिला शेतकरी गटाच्या अध्यक्षा हर्षाली नाईकनवरे मंदाकिनी साळूंके,गंगाताई लबडे निता पोळ,प्रतिभा पोळ,विद्या जाधव यांनी केले सुरवातीला प्रास्ताविक कृषी विभागाच्या रोहीनी सरडे यांनी केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अत्माचे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक अजय बागल यांनी केले तर आभार सत्यम झिंजाडे यांनी मानले.या कार्यक्रमाला मिनाताई वळेकर, माधुरी साळूंके, वनिता निंबाळकर,सुदामती लबडे, अर्चना चोरगे,सुवर्णा लबडे, शुभांगी पोळ,नंदा उंबरे,सुमन पोळ,कमल लबडे,रत्तन लबडे सुनिता लबडे ,रूणिता लबडे निता टकले,पारूबाई लोखंडे,रुपाली साबळे यांच्यासह गावातील महीला शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होत्या.
