पिंपळवाडी येथील १६ वर्षाची मुलगी बेपत्ता..
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : पिंपळवाडी (ता. करमाळा) येथील १६ वर्षाची मुलगी बाथरूमला जाऊन येते म्हणून घरातून बाहेर गेली ती परत आली नाही. या प्रकरणी मुलीच्या वडीलांनी करमाळा पोलीसात फिर्याद दिली.
त्यात त्यांनी म्हटले आहे, की आम्ही मुळचे इंदापूर तालुक्यातील असून पिंपळवाडी येथे वीटभट्टीवर मागील दोन वर्षापासून कामाला आहोत. तसेच आमच्या प्रमाणेच एक जोडपे येथे कामाला असून त्यांना एक मुलगा आहे. २७ नोव्हेंबर रोजी सकाळी आम्ही कामाला जाऊन सायंकाळी सात वाजता घरी आलो. त्यावेळी माझी मुलगी आईला बाथरूमला जाऊन येते म्हणून घराच्या बाहेर पडली ती परत आलीच नाही. आम्ही सर्वत्र शोध घेतला परंतू ती आढळून आली नाही.
आमच्या सोबत वीटभट्टीवर काम करणारे जे जोडपे आहे त्यांचा मुलगाही बेपत्ता आहे. यावरून आम्हाला संशय आहे की.. त्या मुलाने आमच्या मुलीस फूस लावून पळवून नेले आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.