करमाळ्यातील साठेनगरमध्ये मटका चालविणाऱ्यावर पोलीस कारवाई.. - Saptahik Sandesh

करमाळ्यातील साठेनगरमध्ये मटका चालविणाऱ्यावर पोलीस कारवाई..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : करमाळा शहरातील साठेनगर येथे एका पानटपरीच्या पाठीमागे मिलन नावाचा मटका चालवणाऱ्यास पोलीसांनी पकडले असून त्याच्याकडून ८०० रूपयाचे मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अमोल जगताप यांनी फिर्याद दिली.

त्यात म्हटले आहे, की सहाय्यक पोलीस जगताप यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक ढवळे यांचेसोबत करमाळा शहरात पेट्रोलिंग करत असताना साठेनगर येथील पानटपरीच्या मागे मिलन नावाचा मटका चालविणाऱ्या राजेश येळशी वाघिरे ( वय ३६, रा.निगडी, ता.हवेली, जि. पुणे. सध्या रा. साठेनगर, करमाळा) याला रंगेहाथ पकडले असून त्याच्याकडून ८०० रूपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी वाघिरे यांचेवर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!