रणजितसिंह फरतडे यांची इंडियन नेव्हीमध्ये निवड..
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : सातोली (ता. करमाळा) येथील रणजितसिंह रमेश फरतडे यांची इंडियन नेव्ही मध्ये निवड झाली असून, सध्या आय. एन. एस. चिक्ला, ओडिसा येथे ट्रेनिंगसाठी गेले आहेत. रणजितसिंह फरतडे यांचे प्राथमिक शिक्षण जि.प.शाळा सातोली येथे झाले असून माध्यमिक व उच्च शिक्षण बबनराव शिंदे माध्यमिक विद्यालय अकोले (खूर्द ) येथे झाले.
रणजितसिंह यांना बारावीला विज्ञान शाखेत ८९ टक्के गुण मिळाले होते, रणजितसिंह फरतडे हे शेतकरी कुटूंबातील असून त्यांनी कोणत्याही अकॅडमीशिवाय आपल्या मेहनतीच्या जोरावर इंडियन नेव्हीमध्ये प्रवेश मिळवला आहे. यासाठी त्यांनी मुंबई येथील कुलाबा येथे लेखी व मैदानी परीक्षा दिल्या होत्या. त्यामध्ये ते यशस्वी होऊन त्यांची निवड झाली आहे. या निवडीबद्दल सातोली ग्रामस्थांनी फरतडे यांचे अभिनंदन केले आहे.