जातेगाव येथे वृध्द महिलेस मारहाण..
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : शेतातील बांधावरून शेळ्या का चारल्या या कारणावरून पती-पत्नीने वृध्द महिलेस डोक्यात दगड घालून खाली पडून जबर जखमी केले आहे. या प्रकरणी वैशाली विकास आरणे (रा. जातेगाव) यांनी करमाळा पोलीसात फिर्याद दिली.
त्यात त्यांनी म्हटले की, माझ्या सासूबाई नंदाबाई आरणे या शेतात शेळ्या चारत होत्या. शेळ्यांना पाणी पाजण्यासाठी घेऊन जात असताना आमच्या भावकीतील मच्छिंद्र निवृत्ती आरणे व लताबाई मच्छिंद्र आरणे यांनी माझ्या सासूला तु आमच्या शेतातील बांधावरून शेळ्या का चारल्या, आमच्या शेतात यायचे नाही.. असे म्हणून शेजारील दगड उचलून सासूबाईच्या डोक्यात मारून जबर जखमी केले. लताबाई हिने माझ्या सासूबाईला खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच मी सोडविण्यासाठी गेले असता मलाही त्यांनी मारहाण केली.. याप्रकरणी पतीपत्नीवर पोलीसात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे.