दारू विक्रेत्यांच्या विरोधात पोलीसांचे धाडसत्र सुरूच – पाच जणांवर गुन्हे दाखल..
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : तालुक्यातील बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्यांवर पोलीसांचे धाडसत्र सुरूच असून २ नोव्हेंबरला पोलीसांनी पाच दारूविक्रेत्यांवर कारवाई केली असून ४ हजार ३३० रूपयाचा माल जप्त केला आहे.
पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीसांनी बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या विरोधात मोहिम राबवली असून मागील आठवड्यात २५ दारू विक्रेत्यांवर पोलीस कारवाई करून २५ हजार ४९० रूपयाचा मुद्देमाल जप्त केला होता. त्यानंतर पोलीसांनी धाडसत्र सुरूच ठेवले असून २८ नोव्हेंबरला पोलीस कॉन्स्टेबल नितीन चव्हाण, अमोल जगताप, ज्योतीराम बारकुंड, बालाजी घोरपडे, सूरज तनपुरे यांनी बेकायदेशीर दारू विक्रेत्यांवर फिर्यादी दाखल केल्या आहेत.
यामध्ये भाळवणी येथे महिला राणी दत्ता वाळके (वय – ४३) हिच्याकडून ८०० रूपयाचा मुद्देमाल, भालेवाडी येथे दादासाहेब सुलतान तरंगे (वय ४५) यांच्याकडून ११०० रूपयाचा मुद्देमाल, सोगाव (पश्चिम) येथे महिला कौशल्या बजरंग शिंदे (वय – ४१) हिच्याकडून ७०० रूपयाचा मुद्देमाल, सालसे-फिसरे रोडवर सोमनाथ नागनाथ सपकाळ (वय २२, रा.सालसे) याच्याकडून ९१० रूपयाचा मुद्देमाल, खडकी येथे प्रकाश श्रीरंग शिंदे (वय६०) ८०० रूपयाचा मुद्देमाल असा एकूण ४ हजार ३३० रूपयाचा माल जप्त केला असून या प्रकरणी पोलीसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.