छत्रपती चौकात आडवी रिक्षा लावल्याने गुन्हा दाखल - Saptahik Sandesh

छत्रपती चौकात आडवी रिक्षा लावल्याने गुन्हा दाखल

करमाळा / संदेश प्रतिनिधी

करमाळा : करमाळा शहरातील भवानीनाका छत्रपती चौकात रिक्षा चालकाने रस्त्याच्या मध्ये आडवी व अपघात होईल अशी रिक्षा उभी केल्याने करमाळा पोलीसांनी त्याचेवर गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल दिपक नागनाथ कांबळे यांनी फिर्याद दिली असून त्यांनी म्हटले आहे, की पोलीस निरीक्षक गुंजवटे यांचे आदेशाने पोलीस कॉन्स्टेबल माहूलकर व पोलीस नाईक जगताप यांचेसह मी करमाळा शहरात पेट्रोलिंग करत असताना, शहरातील भवानीनाका छत्रपती चौकात रिक्षा चालक महेश दयानंद पवार (वय-२७, श्रीदेवीचामाळ) याने रस्त्याच्या मध्ये आडवी व अपघात होईल अशी रिक्षा उभी केल्याने त्याचेवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!