लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकणातील दोघांची निर्दोष मुक्तता - Saptahik Sandesh

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकणातील दोघांची निर्दोष मुक्तता

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकणातील दोघांची बार्शी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे.सी.जगदाळे यांनी निर्दोष मुक्तता केली आहे. याप्रकरणी आरोपीतर्फे ॲड. निखिल पाटील व ॲड. दत्तप्रसाद मंजरतकर यांनी तर सरकारतर्फे ॲड. पीए बोचरे यांनी काम पाहिले.

यात हकीगत अशी की पोफळज (ता.करमाळा) येथे २५ नोव्हेंबर २०१५ रोजी यातील फिर्यादीच्या मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिचे अपहरण केल्याप्रकरणी 1) अशोक अण्णा शिंदे 2) अण्णा कृष्णा शिंदे व सुनील कृष्णा शिंदे यांचे विरुद्ध करमाळा पोलीस स्टेशन येथे पीडीतेच्या वडिलांनी गुन्हा दाखल केला होता, सदर गुन्ह्याचा तपास पी.एस.आय.श्री दबडे यांनी करून जिल्हा व सत्र न्यायालय बार्शी येथे आरोप पत्र दाखल केले होते.

सदर खटल्याची सुनावणी बार्शी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे.सी.जगदाळे यांच्यासमोर झाली, सदर खटलाच्या सुनावणीच्या वेळी सरकार पक्षाच्यावतीने फिर्यादी व अल्पवयीन मुलगी यांचे जबाब नोंदवण्यात आले, आरोपीचेवतीने ॲड.निखिल पाटील यांनी घटने दिवशी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण होते व त्यासंदर्भात आधार कार्ड वरील जन्म तारखेचा दाखला दिला तसेच दोघांमध्ये प्रेम संबंध असून त्यांनी स्वतःहून घर सोडलेले होते व त्यांचा विवाह झालेला असून त्यांनी कोणताही गुन्हा केलेला नसल्याचा युक्तिवाद केला, सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी अशोक अण्णा शिंदे सुनील कृष्णा शिंदे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली तर यातील आरोपी अण्णा कृष्णा शिंदे हे खटला प्रलंबित असताना मयत झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!