मांगी तलावाचा कायमस्वरूपी कुकडी लाभक्षेत्रात समाविष्ट करावा - अंगद देवकते - Saptahik Sandesh

मांगी तलावाचा कायमस्वरूपी कुकडी लाभक्षेत्रात समाविष्ट करावा – अंगद देवकते

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : करमाळा तालुक्यातील २२ हजार हेक्टर क्षेत्र कुकडीच्या लाभक्षेत्रात असून मांगी (ता.करमाळा) येथील तलावाचा कुकडी लाभक्षेत्रात समावेश नाही, वेळोवेळी मागणीनुसार कायमस्वरूपी पाणी न येता सल्लागार समितीच्या निर्णयानंतर अनेकदा केवळ थोड्या प्रमाणात पिण्यासाठीच पाणी सोडले जाते, मांगी तलावाच्या वरील भागात छोटे-मोटे बंधारे व उप कॅनाॅल चाऱ्या असल्याने आणि लांबीचे अंतरामुळे पाणी तलावात येत नाही, त्यामुळे मांगी तलावाचा कायमस्वरूपी कुकडी लाभक्षेत्रात समावेश करून बोगदा अथवा पाइपलाइनद्वारे पाणी आणण्याचे नियोजन करावे अशी मागणी रासप जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते यांनी माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना एका निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन करमाळा येथील आढावा बैठकीप्रसंगी खा.नाईकनिंबाळकर यांना देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले की, करमाळा तालुक्यातील उत्तर भागातील इंग्रज कालीन ऐतिहासिक असलेल्या मांगी तलावाची निर्मीती 1955 ला झाली. उजवा कालवा सत्तावीस तर डावा कालवा नऊ किलो मिटर चा व मध्यभागी कान्होळा नदीच्या प्रवाह आहे. 1957ला मांगी कालवा पूर्ण होऊन पहीले आवर्तन सोडले. मांगी तलावाची एक टीएमसी ची क्षमता आहे. त्या तलावाच्या ओलिताखाली जवळपास 2050 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र,शेतकरी,जनावरे,आणि पाणी वापर संस्था अवलंबून आहे. त्या अंतर्गत बोरगाव,हिवरवाडी, वडगाव, पूनवर, भोसे आशा महत्वाकांक्षी कोट्यावधी रुपये खर्च करून शासकीय प्रादेशिक पाणी पुरवठा अवलंबून आहेत. “धरण उशाला तर कोरडं घशाला” अशी परिस्थिती या पंच्चवीस गावाची आहे. त्यामुळे अशी वैशिष्ट्य पूर्ण गावं कर्जत,श्रींगोदा,करमाळा परिसरातील पावसाच्या पाण्यावरवरच अवलंबून असतात. अन्यथा दुष्कळ व टॅकरने पाणी घ्यावे लागते.

करमाळा तालुक्याच्या उत्तरेला १९५५ मध्ये तयार झालेला मांगी तलाव कान्होळा नदी व पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहे. हा तलाव सध्या कर्जतमधील बावीस तर करमाळ्यातील सहा बंधाऱ्यांमुळे पाणी टेल टू हेड पर्यंत येत नाही. मांगी तलावाचा कुकडीत सामावेश झाल्यास पंचवीस गावांना हक्काचे पाणी कायमस्वरूपी मिळू शकते. आणि या भागातील संपूर्ण क्षेत्र ओलिताखाली येऊन शेतकऱ्यांचा आर्थिक हातभार वाढेल. यामुळे कुकडीमधून दरवर्षी एक टीएमसी पाणी मिळणे हाच एकमेव पर्याय आहे. या अंतर्गत मांगी, पोथरे, बिटरगाव, तरटगाव,पोटेगाव, पाडळी,बोरगाव, निलज, करंजे,भालेवाडी, खांबेवाडी, अर्जुननगर, मिरगव्हाण, दिलमेश्वर, बोरगाव,घारगाव, रायगाव, वडगाव, पूनवर, हिवरवाडी, भोसे यासह परिसरातील २२ ते २५ गावांना याचा लाभ होणार नक्कीच आहे.

परंतु कुकडीच्या लाभक्षेत्रात एक टीएमसी पाणी मांगी तलावाला येत नसल्याने पाणी येण्यासाठी सतत चोरी,पळवापळवी,होऊन दुर्लक्षित केले जाते. त्यातच मांगीपासून काही अंतरावर नव्याने एमआयडीसी सुरू होत आहे. परंतु तेथे पाणी नसल्याने अद्याप ते काम रखडले आहे.तोही तालुक्यासाठी महत्वाकांक्षी विषय धूळ खात पडून आहे. त्यामुळे आपल्या स्तरावर विचार करून मांगी तलावात हक्काचे कायमस्वरूपी एक टीएमसी मिळावे अशा मागणीचे पत्रात राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते अंगद देवकते म्हटले आहे. यावेळी रासप जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते,भाजपा शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, रासप ता.उपाध्यक्ष विठ्ठल भिसे, विधानसभा अध्यक्ष शंकर सुळे,जिवन होगले,नरेंद्रसिह ठाकुर, तालुका सरचिटणीस शाम सिंधी, ता.अध्यक्ष राज शेटे देशमुख, डाॅ.भाग्यवंत बंडगर, प्रविण होगले, नेते सुहास ओहोळ,माजी सरपंच संदिप मारकड,विलास घोणे, तानशेन खांडेकर, संजय जमदाडे,रावसाहेब बिनवडे इत्यादी उपस्थित होते.

Yash collection karmala clothes shop

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!