करमाळा शहरातून भरदिवसा मोटारसायकलची चोरी... - Saptahik Sandesh

करमाळा शहरातून भरदिवसा मोटारसायकलची चोरी…

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : करमाळा शहरातील मेनरोडवरुन बॅंकेसमोर लावलेली मोटारसायकल भरदिवसा चोरट्यांनी पळविली आहे. ही घटना २३ सप्टेंबरला सकाळी १०:३० ते ६ वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. याप्रकरणी करमाळा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी आण्णासाहेब पांडुरंग मोटे (रा.धायखिंडी ता.करमाळा) यांनी फिर्यादी दिल्या असून त्यात त्यांनी म्हटले की, मी गोविंददास गोपाळदास देवी यांचे शेती औषधे, बी बियाणे या दुकानामध्ये काम करतो, मी सन 2016 मध्ये हिरो होन्डा कंपनीची स्पेंल्डर प्लस मोटार सायकल तिचा नं एम एच 12 एफ एस 6571 ही खरेदी केली होती. मी माझे मोटार सायकलवरुन दररोज घरी ये जा करीत असतो. माझी मोटार सायकल ही नेहमी कामावर आलेनंतर शंकरराव मोहिते पाटील बके समोर लावत असत.

23 सप्टेंबर रोजी सकाळी 10:00 वाचे सुमारास माझे राहते घरातुन हिरो होन्डा कंपनीची स्पेंल्डर प्लस (१५ हजार रुपये किमतीची) मोटारसायकल तिचा नं एम एच 12 एफ एस 6571 ही घेवुन कामा करीता करमाळा येथे आलो त्यानंतर साधारण सकाळी 10:30 वाचे सुमारास माझी मोटार सायकल ही शंकरराव मोहिते पाटील बॅंकसमोर हॅन्ड लॉक करुन लावली होती. त्यानंतर मी गोविंददास गोपाळदास देवी यांचे दुकानात काम करीत असताना साधरण 06:00 वा चे सुमारास मला माझे ओळखीचा मित्र संतोष राजाराम वीर यांनी येवुन सांगितले की, तुमची मोटार सायकल ही तुम्ही लावलेल्या ठिकाणी दिसुन येत नाही. तेव्हा मी लागलीच सदर ठिकाणी गेलो असता माझी मोटारसायकल ही मिळुन आली नाही.

मी व संतोष राजाराम वीर असे मिळुन गाडीचा आजुबाजुला शोध घेतला परंतु गाडी काही मिळुन आली नाही तेव्हा पासुन आज पर्यंत मोटार सायकलचा शोध घेतला असता ती मिळुन आली नाही. तेव्हा माझी खात्री झाली की माझी मोटार सायकल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!