कंदरजवळ एस.टी.बस व कंटेनरचा अपघात – बसचालक जखमी – एस.टी.बसचे नुकसान

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : कंदर (ता.करमाळा) परिसरातील शिंदेवस्तीजवळ अहमदनगर-टेंभुर्णी रस्त्यावर एका कंटेनरने भरधाव वेगाने एस.टी.बसला जोराची धडक दिली असून यामध्ये एस.टी.बस चे नुकसान झाले असून बसचालकाला दुखापत झाली आहे. याप्रकरणी करमाळा पोलिसांनी अज्ञात कंटेनर चालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी रामा सगा मडके (एस टी चालक) (रा.कोळवाला ता.संगमनेर जि. अहमदनगर) यांनी करमाळा पोलिसात फिर्याद दिली असून त्यात त्यांनी म्हटले कि, 26 सप्टेंबर रोजी सकाळी 08:00 वाचे सुमारास संगमनेर ते पंढरपुर ही एस टी न एम एच 40 वाय 5994 ही घेवुन पंढरपुरकडे निघालो होतो.

मी साधारण सायं 04:00 वाचे सुमारास कंदर येथील शिंदे वस्तीजवळ आलो असता माझे समोरुन एक कंटेनर भरधाव वेगाने येवुन माझे ताब्यातील एस टी नं एम एच 40 वाय 5994 या गाडीला उजव्या बाजुला जोराची धडक दिली असता माझे ताब्यातील एस टी चे समोरील काच फुटुन नुकसान होवुन माझे डोक्याचे डावे बाजुला गाडीची समोरील काच फुटुन उड्डुन माझे डोक्याला जखम झाली आहे. त्यानंतर मी लागलीच एस टी मधुन खाली उतरुन सदर कंटनेरचा नंबर जवळ जावुन पाहिले असता त्या कंटेनर चा 9479 असा होता. त्यानंतर मी आमचे एस टी डेपोतील अधिकारी यांना फोन करुन सदर घटना सांगितली. करमाळा पोलिसांनी अज्ञात कंटेनर चालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!