केमच्या अंगणवाडी सेविका लोखंडे व कांबळे यांना जिल्हा परिषदेचा पुरस्कार प्रदान - Saptahik Sandesh

केमच्या अंगणवाडी सेविका लोखंडे व कांबळे यांना जिल्हा परिषदेचा पुरस्कार प्रदान

केम (प्रतिनिधी- संजय जाधव) : केम (ता.करमाळा) येथील इंदिरा नगर अंगणवाडी सेविका अंजली लोंखडे व मदतनीस रंजना मच्छिंद्र कांबळे यांना सन २०१९-२०२० या वर्षीचा उल्लेखनीय काम केल्याबद्दल सोलापूर जिल्हा परिषदेचा ‘आदर्श अंगणवाडी सेविका’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

आरोग्य सेवेसाठी अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे योगदान मोठे आहे.गरोदर माता,स्तनदा माता यांच्या आरोग्याकडे लक्ष देऊन बालके, मातेचे प्राण वाचविण्याचेही काम या अंगणवाडी सेविकांनी चांगल्याप्रमाणे केल्याबद्दल या कामाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार सोलापूर जिल्हा परिषद च्या वतीने मिळाला आहे.

हा पुरस्कार जिल्हा परिषद माजी अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटिल, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजय सिंह पवार, जिल्हा कार्यअधिकारी जावेद शेख प्रकल्प अधिकारी श्री. माने आदि उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल माजी सरपंच अजितदादा तळेकर,सरपंच आकाश भोसले, ऊपसरपंच नागनाथ तळेकर ग्रामविकास अधिकारी नलवडे, करमाळा तालुका शिवसेना महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ वर्षा ताई चव्हाण,केम केंद्र प्रमुख महेश कांबळे,सुपरवायझर आतकर मॅडम,कांबळे मॅडम, अंगणवाडी सेविका टांगडे मॅडम, सुनिता बरकडे, कुरडे,राणी तळेकर, सविता गावडे यांनी अभिनंदन केले आहे.त्यांचे केम परिसरातून कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!