रावगावचे संतोष काळे यांना 'आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार' प्रदान - Saptahik Sandesh

रावगावचे संतोष काळे यांना ‘आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार’ प्रदान

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : भोसरी (पुणे) येथे श्री टागोर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले व मुळ गाव रावगाव (ता.करमाळा) येथील रहिवासी संतोष काळे यांना पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाच्यावतीने दिल्या जाणारा ‘आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार’ राज्याचे अप्पर शिक्षण सचिव दीपक शेलार यांच्या हस्ते देण्यात आला.

सदर पुरस्कार हा त्यांनी माध्यमिक विभागात केलेल्या उल्लेखनीय कामकाजाबद्दल देण्यात आला असून, त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. त्यांच्या या पुरस्काराबद्दल रावगावचे सरपंच दादासाहेब जाधव, उपसरपंच विष्णु गर्जे त्याचबरोबर मकाई सहकारी कारखान्याचे माजी संचालक प्रताप बरडे, पंडित जवाहलाल नेहरू विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.कोळेकर व रावगावातील युवकांनी त्यांचे कौतुक व अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!