२ ऑक्टोबरला कोर्टीचे धनंजय अभंग यांना राष्ट्रपती करणार सन्मानित
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : येत्या २ ऑक्टोबरला कोर्टी (ता.करमाळा) येथील धनंजय निळकंठ अभंग यांना राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू या पुरस्कार देऊन सन्मानित करणार आहेत. हा पुरस्कार दिल्ली येथे दिला जाणार आहे.
धनंजय अभंग हे ज्या कंपनीत कार्यरत आहेत त्या कंपनीव्दारे त्यांनी किसान बायोगॅस सयंत्र निर्माण केले आहे. या यंत्राला भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाव्दारे आयोजित केलेल्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत व्दित्तीय क्रमांकाचा सर्वोत्तम स्टार्टअप पुरस्कार जाहीर झाला आहे. श्री. अभंग यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल आ. संजयमामा शिंदे यांनी विशेष अभिनंदन केले आहे.