दिवेगव्हाण येथे दारू विक्रेत्यावर कारवाई - Saptahik Sandesh

दिवेगव्हाण येथे दारू विक्रेत्यावर कारवाई

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : दिवेगव्हाण (ता. करमाळा) येथे बसस्थानकाजवळ वडापाव गाड्याशेजारी देशी दारू विक्री करणाऱ्यावर पोलीसांनी कारवाई केली आहे. विशेष म्हणजे पोलीसांना पाहून हा दारू विक्रेता दारूची पिशवी ठेवून पळून गेला होता.

हा प्रकार २६ सप्टेंबरला सायंकाळी साडेसहा वाजता घडला आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल ललित गजेंद्र शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की दिवेगव्हाण येथे देशी दारू विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यावर दिवेगव्हाण येथे गेलो असता, बसस्थानकाजवळ वडापाव गाडीच्या शेजारी बबन ज्ञानदेव पाडोळे (रा. दिवेगव्हाण) हा एका पिशवीत संत्रा कंपनीच्या देशी दारूच्या बाटल्या ठेवून विक्री करताना आढळला.

आम्हाला पाहताच तो दारूच्या बाटल्या असलेली पिशवी जागेवर ठेवून पळून गेला. पंचासमक्ष ती पिशवी ताब्यात घेतली असता त्या पिशवीत ८४० रू. च्या संत्रा कंपनीच्या १२ सिलबंद बाटल्या सापडल्या. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!