रतिराज जानराव यांचे निधन

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : शिवक्रांती स्पोर्ट क्लबचा प्रमुख व तहसील कार्यालयातील कर्मचारी रतिराज किसनराव जानराव (वय-३२) यांचे आज (ता. २७) पहाटे सोलापूर येथे एक वाजता निधन झाले. त्यांच्या मागे आई-वडील, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.

रतिराज जानराव यांची घरची स्थिती अतिशय नाजूक असून आईने फळे व भाजीपाला विक्री करून त्यांना शिकवले होते. रतिराज हे तहसील कार्यालयात ठेकेदाराचे प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते. अतिशय संयमी व अनेक मित्र असलेला हा तरूण शिवक्रांती स्पोर्टस् क्लबमधील क्रिकेट मध्ये बॉलर म्हणून प्रसिध्द होता.

तहसील कार्यालयात काम करतानाच अचानक चक्कर आल्याने त्यांना दवाखान्यात दाखल केले. मेंदूत गाठ आल्याने सोलापूर येथील खाजगी रूग्णालयात दाखल केले होते. लाखो रूपये खर्च करूनही दुर्दैवाने त्यांचे आज पहाटे निधन झाले. त्यानंतर करमाळा येथे सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी रतिराज यांचा मोठा मित्र परिवार उपस्थित होता.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!