ह.भ.प.मारूती साखरे यांचे निधन
करमाळा /संदेश प्रतिनिधी :
करमाळा (ता.9) : ह.भ.प. मारूती संभाजी साखरे (वय-70)रा.राजुरी यांचे अल्प आजाराने आज (ता.9) सकाळी 9-25 वाजता राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी,मुलगा सून, नातवंडे असा परिवार आहे. हभप सपना महाराज साखरे यांचे ते आजोबा होते.हभप सपना महाराज यांचे जडणघडणीत आजोबा (आबा) यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या जाण्याने राजुरी येथे शोककळा पसरली आहे.