करमाळ्यात मोहरम उत्साहात – मानाच्या सवारींची काढली सवाद्य मिरवणूक

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा शहरातील सर्व हिंदु-मुस्लिम बांधवांनी आज (ता.९) मोहरम सणानिमित्ताने सवारीची स्थापना केली असुन, या सर्व हिंदु-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या सवारीची आज पावसाच्या रिमझिममध्ये सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
यामध्ये भुईकोट किल्ला येथील मानाची नालसाहेब सवारी, हिंदु मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेली कुंभारवाडा येथील अल्लाऊदीन साहेब यांची सवारी, मोहीद्दीन तालीम येथील सवारी, खाटीक गल्लीतली नालेहैदर सवारी, भवानी पेठ येथील लालन साहेब सवारी, फरीद मास्तर यांची सवारी, रंभापुरा येथील दुधाट यांची सवारी, मौलालीनगर येथील मदारी यांची सवारी अशा सर्व सवारीची स्थापना होऊन सवारीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी करमाळा शहरातील सर्व हिंदु मुस्लिम बांधवांनी सवारीचे दर्शन घेऊन सवारीला हारांचा शेरा घालून रेवडीचा वर्षाव केला, यावेळी सर्व मिरवणूका शांततेत पार पडल्या.
सदर मोहरम सण शांततेत पार पाडण्यासाठी, नगरसेवक शौकत नालबंद, जाकीर वस्ताद, हाजी उस्मान सय्यद सय्यदभई पत्रकार, करमाळा अर्बन बॅंकेचे माजी उपाध्यक्ष फारूक जमादार, मैनुद्दीन खर्डेकर, हाशम वस्ताद, इसाक नालबंद, बहुजन विकास चे इसाक पठाण, महमंदशरीफ शेख, ईस्माईल सय्यद, युवा नेते अमीरशेठ तांबोळी, पै.समीर शेख, सोहेल पठाण वस्ताद, रा.काॅ.चे उपाध्यक्ष आझाद शेख, हाजी समीर शेख, शिवसेनेचे संजय शिंदे, कोंडीराम परदेशी, जोतिराम ढाणे, हाजी मज्जीदभाई घोडके, हाजी निस्सार झारेकरी, सोहेल पठाण वस्ताद, माहुले.हलवाइ, समद कुरेशी, सादीकभाई मदारी आदी जणानी परिश्रम घेतले, याप्रसंगी पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे करमाळा शहरात चोख बंदोबस्त ठेवला होता.
.



