केम प्राथमिक आरोग्य केंद्रातील १४ रिक्त पदे तातडीने भरावीत, अन्यथा आंदोलन करू - प्रहार संघटना - Saptahik Sandesh

केम प्राथमिक आरोग्य केंद्रातील १४ रिक्त पदे तातडीने भरावीत, अन्यथा आंदोलन करू – प्रहार संघटना

केम ( प्रतिनिधी – संजय जाधव) : केम(ता. करमाळा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एकूण 22 पदापैकी 14 पदे अनेक महिन्यांपासून रिक्त आहेत. ही पदे तातडीने शासनाकडून भरून लोकांना सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केम येथील प्रहार संघटने मार्फत करण्यात आली आहे.

सर्व सामान्य नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न 15 दिवसाच्या आत मार्गी लावावा अन्यथा प्रहार स्टाईलने आंदोलन करणार असल्याचा इशारा प्रहारचे संपर्क प्रमुख सागर पवार यांनी लेखी निवेनाद्वारे जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे केला आहे.

दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, केम प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत चार उपकेंद्रे येत असून या उपकेंद्रांतर्गत सतरा गावे आहेत. या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा मंजूर आहेत. मागील अनेक महिन्यांपासून पासून एकच डाॅक्टर येथे कार्यरत आहेत. याचबरोबर अनेक कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. वेळोवेळी तक्रार करून देखील याची दखल घेतली जात नाही.आता पावसाळा सुरू झाला आहे. पावसामुळे वातावरणात बदल होऊन रुग्णांची संख्या वाढते. याचा फटका परिसरातील गाेरगरीब रुग्णांना बसत आहे.

केम प्राथमिक आरोग्य केंद्रात एकूण 22 पदे असून त्यापैकी 14 पदे रिक्त आहेत.
रिक्त पदे
1)आरोग्य सहाय्यिका 1
2)आरोग्य सेविका 4
3)आरोग्य सेवक 3
4)औषध निर्माण अधिकारी 1
5)प्रयोग शाळा तंत्रज्ञ 1
6)एक्स रे टेक्निशिअन 1
7)परीचर पुरुष 1,महिला 1
एकूण 8 कर्मचारी कामावर असल्यामुळे त्यात फक्त 4 च कर्मचारी प्राथमिक आरोग्य केंद्रात कामावर असल्यामुळे कर्मचाऱ्यां बरोबर लोकांच्या आरोग्याची हेळसांड या ठिकाणी मोठया प्रमाणावर होत आहे.

एकीकडे देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली आपण 75 वर्षा नंतर देखील जर जनतेला आपण चांगल्या प्रकारच्या आरोग्य सुविधा देऊ शकत नसेल तर आपण कोणती प्रगती केली, कोणता तीर मारला, कोणत्या ताठ मानेने आपण जगतो आहोत.याचा विचार सत्ताधारी व विरोधकांनी केला पाहिजे, एकीकडे सत्तेवर असणारे लक्ष द्यायला तयार नाहीत तर विरोधक यावर जाब विचारायला तयार नाहीत .त्यामुळे सर्व सामान्य माणूस यात होरपळून निघत आहे. शेवटी लवकरात लवकर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरून घ्यावीत. सर्व सामान्य नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न 15 दिवसाच्या आत मार्गी लावावा अन्यथा प्रहार स्टाईलने आंदोलन करु.

निवेदन देताना प्रहारचे तालुका अध्यक्ष संदीप तळेकर ,तालुका संघटक नामदेव पालवे,तालुका सचिव प्रवीण मखरे, तालुका अध्यक्ष स्वाती ताई गोरे,तालुका कार्याध्यक्ष शारुख शेख,तालुका उपाध्यक्ष सोमनाथ जाधव,मलवडी शहर अध्यक्ष जॉन मंगवडे, सौंदे शहर संपर्क पमुख किरण सुकळे, सौंदे शहर अध्यक्ष धनंजय डिकोळे, पाथुर्डी शहर अध्यक्ष समाधान मोठे,केम शहर अध्यक्ष गोटू बोंगाळे,याच बरोबर अनेक प्रहारचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Keywords : kem prathmik arogya Kendra news| kem news | saptahik sandesh |

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!