वेताळपेठेतील गजानन सोशल अँड स्पोर्टस क्लबच्या गणेशोत्सवानिमित्ताने कार्यकर्त्यांची बैठक – कार्यकारिणी निवडी संपन्न

करमाळा / संदेश प्रतिनिधी : 

करमाळा : करमाळा शहरातील वेताळपेठेतील गजानन सोशल अँड स्पोर्टस क्लबच्या गणेशोत्सव समितीच्या कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच संपन्न झाली असून, या बैठकीत पदाधिकाऱ्यांची निवडी करण्यात आल्या आहेत. मंडळाच्या अध्यक्षपदी अल्ताफशेठ दारूवाले तर उपाध्यक्षपदी संतोष लोकरे तसेच खजिनदारपदी योगेश सोरटे व संतोष वेंगलम यांच्यासह इतर निवडी मंडळाचे संस्थापक व माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे यांच्या उपस्थितीत करण्यात आल्या आहेत.  

गजानन सोशल अँड स्पोर्ट क्लबचे हे 23 वर्ष असून, कोरोनाच्या दोन वर्षाच्या खंडानंतर यावर्षी गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. गणेशोत्सव समितीच्या कार्यकर्त्यांच्या या बैठकीत मिरवणूकपदी निखिल बनकर व सचिवपदी आशिष शेठ मंडलेचा यांची निवड झाली आहे. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करून या गणेशोत्सवामध्ये आरोग्य शिबिर व विविध स्पर्धा घेण्याचे ठरले आहे.  याप्रसंगी मंडळाचे संस्थापक व माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे, समीर बागवान, चेतन ढाळे, अक्षय ढाळे, अमित ढाळे, कुणाल ढाळे, चिन्मय मोरे, शरीफ दारूवाले, दिगंबर ठोंबरे, संजू ढाळे, संदीप ओतारी, प्रीतम बलदोटा, भावेश देवी, निखिल ढाळे, पंकज ढाळे, इर्शाद शिकलकर, रामा धोकटे, विशाल शेळके, संकेत पुराणिक, चेतन कायस्थ, बाबा खराडे, सुधीर शहाणे, रोहित चिवटे, सुमित ढाळे, ज्येष्ठ मार्गदर्शक उमेश माळवे, प्रकाशशेठ बलदोटा, डॉ. गजेंद्र विभुते, प्रदीप ढाळे, विकास ढाळे उपस्थित होते.

Sonaraj metal and crockery karmala
Sonali ply and furniture shop karmala
keywords : Gajanan Social and sports club Vetal peth Karmala | saptahik Sandesh news | Ganeshotsav

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!