सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद तानाजीराव सावंत यांच्याकडे द्यावे - महेश चिवटे - Saptahik Sandesh

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद तानाजीराव सावंत यांच्याकडे द्यावे – महेश चिवटे

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा (ता.९) : राज्यातील मंत्रिमंडळात प्रा. तानाजीराव सावंत यांचा कॅबिनेट मंत्रीपदी शपथविधी झाल्यानंतर शिवसैनिकांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद तानाजीराव सावंत यांच्याकडे द्यावी अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केली आहे.

याप्रसंगी शहरप्रमुख संजय आप्पा शीलवंत उपशहर प्रमुख नागेश गुरव राजेंद्र काळे मारुती भोसले नागेश शेंडगे युवा सेनेचे मावलकर हिवरवाडी शाखाप्रमुख आजिनाथ इरकर संजय जगताप राजेंद्र मिरगळ यांनी आनंद उत्सव साजरा केला.

यावेळी बोलताना उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे म्हणाले की, गेली अडीच वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सत्तेचा वापर स्वतःच्या कुटुंबासाठी व स्वार्थासाठी केला होता, आता खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्यांचे सरकार आले असून, सोलापूर जिल्ह्यातील सर्व प्रकल्प मार्गी लागतील रखडलेले प्रश्न मार्गी लागतील, तसेच प्राध्यापक तानाजीराव सावंत यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश झाल्यामुळे एक सक्षम व धडाकेबाज निर्णय घेणारा मंत्री सोलापूर जिल्ह्याला मिळणार असून करमाळा तालुक्यातील दहेगाव सिंचन योजना कुकडीचे उर्वरित कामे रस्त्याची कामे अधिक कामे मार्गी लागतील,
असा विश्वास उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी व्यक्त केले आहे.

keywords : Mahesh chivate | chivte | minister Dr. Tanaji Sawant | karmala | solapur | saptahik sandesh news | shivsena |

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!