माजी सैनिक कोडिंबा मोरे यांचे निधन

केम(संजय जाधव) – केम (ता.करमाळा) येथील माजी सैनिक कोडिंबा राजाराम मोरे यांचे अल्पशा आजाराने दि.३१ मार्च रोजी सकाळी सात वाजता निधन झालेले आहे.
मोरे यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने पुणे येथील कंमाड आर्मी हाॅस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. परंतू त्यांना नियतीची साथ मिळाली नाही अखेर प्राणज्योत मावळली. मृत्यू समयी त्यांचे वय वर्ष ८५ होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सून, नात असा परिवार आहे.
मेजर मोरे यांनी आपल्या आयुष्यातील २१ वर्ष देशसेवेसाठी योगदान दिले होते. १९७१-७२च्या युध्दात त्यांचा सहभाग होता. सेवेत असताना त्यांना एकूण ९ पदकानी वरीष्ठ अधिकाऱ्यां मार्फत त्यांचा सन्मान झाला होता. ते शिवसेना महिला उबाठा गट अध्यक्षा आशा मोरे यांचे पती होते.
त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष व माजी सैनिक रघुनाथ मेजर व इतर माजी सैनिक उपस्थित होते त्यांच्या निधनाने केम व परिसरात हळहळ,व्यक्त होत आहे.





